307 कलम म्हणजे काय? कलम 307 माहिती मराठी | 307 Kalam In Marathi

307 Kalam In Marathi, 307 कलम म्हणजे काय?, कलम 307 माहिती मराठी, Kalam 307 In Marathi Jamin : नमस्कार मित्रांनो, 307 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

307 Kalam In Marathi
(307 Kalam In Marathi)

307 कलम म्हणजे काय? कलम 307 माहिती मराठी | 307 Kalam In Marathi

३०७. खुनाचा प्रयत्न करणे.

कलम 307 : जो कोणी एखादे कृत्य अशा हेतूने अगर जाणीवपूर्वक अगर अशा परिस्थितीत करतो की, जर त्या कृत्यामुळे मृत्यू आला असता तर त्याला खुनाबद्दल दोषी धरले असते. तसेच त्याला कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा दहा वर्षापर्यंत झाली असती, तो द्रव्यदंडासही पात्र झाला असता आणि जर अशा कृत्याने कोणास दुखापत झाली असती तर त्याला आजन्म कारावासाची अगर वर म्हटलेल्या कारावासाची शिक्षा झाली असती. आजन्म कारावासाच्या आरोपीने खुनाचा प्रयत्न करणे : आणि जर या कलमाखाली अपराध करणारा इसम जर आजन्म करावास भोगत असेल तर त्याने दुखापत केली तर मृत्युदंडाची- मरणाची शिक्षा होईल.

उदाहरणे :-
() अ हा झ चा जीव घेण्याचे इराद्याने अशा प्रकारे त्यावर बंदूक झाडतो की त्यामुळे त्याचा जीव गला असता तर अ कडे खुन केल्याचा गुन्हा आला असता व अ हया कलमाप्रमाणे शिक्षेस पात्र आहे.

() लहान मुलाचा जीव जावा ह्या इराद्याने अ हा त्यास रानात टाकतो. आता त्या मुलाचा जीव गेला नाही तरी अ याने या कलमात सांगितलेला अपराध केला आहे.

() झे याचा खून करण्याकरता त्या इराद्याने अ हा एक बंदुक विकत घेतो तीत बार (गोळ्या) भरतो. अजून त्याने ह्या कलमात सांगितलेला अपराध केला नाही. पुढ़े तो ती बंदूक झे वर सोडतो. आता त्याने हया कलमात सांगितलेला अपराध केला आहे आणि बेंदूक झाडल्यामुळे झ यास जखम झाली तर ह्या कलमाच्या पहिल्या परिच्छेदाच्या शेवटच्या भागात सांगितलेल्या शिक्षेस तो पात्र आहे.

() झ यास विष घालून मारण्याच्या इराद्याने अ हा विष विकत घेतो आणि ते विष अन्नात मिसळून ते अत्न आपणाजवळ ठेवतो. ह्या कलमात सांगितलेला अपराध अ याने अजून केलेला नाही. पुढे तो ते अत्न झ च्या पुढे वाढतो, अगर त्यास ते वाढण्याकरता झ च्या नोकराकडे देतो, तर अ याने या कलमात सांगितलेला अपराध केला आहे.

टीप १ : खुनाच्या प्रयत्नास हे स्वतंत्र शिक्षा कलम आहे. केवळ प्रयत्नास शिक्षा देणारी इतरही स्वतंत्र कलमें आहेत. उदा. १२१, १२५, १३०, १६१, १६२ (आता रद) ३८५, ३८७, ३८९, ३०९, ३९३ वगैरे आहेत अशी तरतूद नसल्यास मंग शेवटचे कलम ५११ लागते. उदा. ३७९,५११ वर्गेर.

टीप २ : कलमांचे वैशिष्टय : जखम न होता अगर साधा ओरखडा न होता देखील या कलमांप्रमाणे गुन्हा होतो. उदाहरण (अ) पाहा नेम धरून बंदूक उडवली पण गोळी जरी लागली नाही तरी गुन्हा आहे. उदाहरण (ड) विषमिश्रित अन्न पुढे ठेवताच जरी ते घेतले नाही तरी गुन्हा आहे. तसेच अ याने ब हा लाकडी बाजेवर झोपला असताना कु्हाडीचा वार ठार मारण्याकरिता केला पण सुदैवाने तो झोपेत कुशीला वळला आणि बाजेला वार लागून ढलपी निघाली तरी गुन्हा आहे.

टीप ३ : केलेल्या कृत्यामुळे मृत्यूची शक्यता : एका घटनेत चार पाच इसमांनी फरशा हत्यार घेऊन एकावर हल्ला केला पण प्रत्यक्षात धारेचे बाजूने मारले नाही त्यामुळे घटना ३०७ खाली न जाता मोठया दुखापतीची कलम ३२६, ३२४ ची भाहे असे सुप्रीम कोटनि धरले आहे. पाहा : “जय नारायण १९७२ GLJ, ४६९ S.C. तसेच “मारतू” केस १५ Bom. LR. ९९१ यात आरोपीने बायकोला मानेत
कुन्हाडीने जखम केली होती त्यामुळे कलम ३०७ न लागता कलम ३२४ प्रमाणे अपराध घडला.

टीप ४ : कोणत्या परिस्थितीत कृत्य केले याला महत्त्व आहे : कलम ३ ०७ खाली शिक्षा देणे करता आरोपीने कोणत्या इराद्याने – जाणिवेने- आणि कोणत्या परिस्थितीत कृत्य केले याला फार महत्त्व आहे. या घटनेत आरोपीने अगदी जवळून दोन गोळ्या पिस्तुलामधून मुंबईच्या गव्हन्र हटसन यांचेवर पूण्यातील एस.पी. कॉलिजमध्य झाडल्या होत्या, परंतु अपेक्षित परिणाम ठार मारण्याचा यशस्वी झाला नाही. कदाचित गावठी चुकीचा दारूगोळ्ा अगर अंगावरील लेदर-वॅलेट आणि करन्सी नोटस् याचा अडथळा निर्माण झाला असावा आणि गव्हर्नर वाचले तरी या कलमाप्रमाणे आरोपस शिक्षा देण्यात आली होती, पाहा “वासूदेव बळवंत गोगटे वि- मुंबई सरकार ३४ Bom.L. R. ५७१ =५६ Bom ४३४ ही प्रसिद्ध केस क्रांतिकारक गोगटे यांची आहे. वेळी ते कॉलेजमध्ये बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला होते. क्रांतिकारकांच्या कटाचा एक भाग म्हणून वरिष्ठ ब्रिटीश अधिकारी कलेक्टर गव्हर्नर यांची हत्या करणे हा भाग होता, वासुदेव बळवेतच्या अगझडतीत आणखी पिस्तुल गोळ्या सापडल्या तसेचे ता राहत असलेल्या वर्सतिगृहातील खोलीत इतर काही साहित्य मिळून आले त्यावरून केलेला ख़ुनाचा प्रयत्न विशिष्ट् परिस्थितीतच केला होता हे दिसून आले. त्यामुळे कलम ३०७ च्या घटकाप्रमाणे गुन्हा घडला होता, अशाच प्रकारचे मतप्रदर्शन सुप्रीम कोटन “ओमप्रकाश’ केसमध्ये A.I. R, १९६१ S. C १७८२ वर केले आहे.

टीप ५ : जखमेस महत्त्व नसून परिस्थितीला आहे : या कलमाखाली आरोपीन त्या परिस्थितीत कोणत्या उद्देशाने, जाणिवेने हल्ला केला याला महत्त्व आहे.


#tags: 307 Kalam In Marathi, 307 कलम म्हणजे काय?, कलम 307 माहिती मराठी, Kalam 307 In Marathi Jamin.

Leave a Comment

Your email address will not be published.