Affiliate marketing म्हणजे काय? Affiliate Marketing Meaning In Marathi – Affiliate Marketing Information In Marathi

Affiliate Marketing म्हणजे काय? Affiliate Marketing Meaning In Marathi – Affiliate Marketing Information In Marathi : नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एफिलिएट मार्केटिंग विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Affiliate marketing म्हणजे काय, Affiliate Marketing Meaning In Marathi, Affiliate Marketing Information In Marathi
(Affiliate Marketing Information In Marathi)

Affiliate Marketing म्हणजे काय? Affiliate Marketing Meaning In Marathi – Affiliate Marketing Information In Marathi

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे समजावून सांगतो. समजा तुम्ही Amazon किंवा Flipkart वरून स्मार्टफोन घेतला. आणि तुम्हाला तो स्मार्टफोन खूप आवडला आणि तुम्ही तुमच्या मित्राला तो स्मार्टफोन विकत घेण्यासाठी सांगितले आणि तुमच्या मित्रानी तुमच्या सांगण्यावरून तोच स्मार्टफोन विकत घेतला. तर इथे तुम्ही त्या स्मार्टफोनची जाहिरात केली. आणि त्या स्मार्टफोन कंपनीचा एक मोबाइल विकण्यासाठी मदत केली. पण इथे तुम्हाला काहीही मिळाले नाही.

पण जर तुम्ही तुमच्या बुद्धीचा इथे थोडा वापर केला असता तर तुम्हाला काही इनकम झाली असती. आता तुम्ही विचाराल ते कसे? तर मित्रांनो बहुतेक ईकॉमर्स वेबसाइट्स आहेत. त्यांची प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते जाहिरातींवर खूप पैसा खर्च करतात. जेणेकरून लोकांना त्यांच्या वेबसाईटबद्दल माहिती मिळेल. आणि लोक त्यांच्या वेबसाइटवरूनच वस्तूंना खरेदी करतील.

म्हणून जर तुम्ही कोणत्याही ईकॉमर्स वेबसाइटचे प्रोडक्ट्स व्हाट्सप्प, फेसबुक, ब्लॉग, किंवा यूट्यूब, इंस्टाग्राम सारख्या ठिकाणी लोकांना रेफर केले तर त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्या लिंकवरून एखादी वस्तू विकले जाईल तेव्हा ईकॉमर्स वेबसाइट तुम्हाला त्याचे काही कमिशन देते. आणि यालाच आपण एफिलिएट मार्केटिंग म्हणतो.

एफिलिएट मार्केटिंगने पैसे कसे कमवायचे? How To Make Money With Affiliate Marketing?

मित्रांनो तुम्ही फक्त ईकॉमर्स वेबसाइटसाठीच एफिलिएट मार्केटिंग केली पाहिजे असे आवश्यक नाही जर तुम्ही makemytrip.com सारख्या कोणत्याही फ्लाइट बुकिंग वेबसाइटवर लोकांना रेफर केले आणि जेव्हा कोणी तुमच्या रेफर केलेल्या लिंकवर क्लिक करून फ्लाइट बुक करेल तेव्हा तुम्हाला येथून कमिशन मिळेल. याशिवाय तुम्हाला इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स मिळतील ज्या एफिलिएट प्रोग्राम ऑफर करतात.

एफिलिएट मार्केटिंग खाते कसे तयार करावे? How to create affiliate account?

मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी खाते तयार करता. त्याच प्रकारे तुम्ही प्रोडक्ट्स विकण्यासाठी खाते देखील तयार करावे यालाच आपण “एफिलिएट खाते” म्हणतो. तुम्ही तुमच्या एफिलिएट मार्केटिंग खात्यामध्ये सर्व प्रॉडक्ट्सच्या लिंक्स तयार करुण शेअर करू शकता. तुम्ही amazon snapdeal, flipkart, makemytrip, oyerooms, godaddy इत्यादींसाठी एफिलिएट खाते तयार करू शकता.

ऍमेझॉन एफिलिएट मार्केटिंग खाते कसे तयार करावे? How to create an Amazon Affiliate Marketing Account?

#1 सर्व प्रथम आपण गूगल मध्ये Amazon affiliate टाइप करुण सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर https://affiliate-program.amazon.in ही लिंक येईल लिंकवर क्लिक करुण वेबसाइटला ओपन करुण घ्या.

#2 आता येथे तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल. यासाठी तुम्ही Create your Amazon Account वर क्लिक करावे.

तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे फॉर्म भरायचा आहे.

बॉक्समध्ये तुमचे पूर्ण नाव टाकावे लागेल. ईमेल आयडी टाकावा लागेल.

ईमेल आयडी टाकावा त्यात OTP येणार आहे. आता तुम्ही एक स्ट्रॉन्ग पासवर्ड निवडा आणि तुमचे Amazon खाते तयार करा वर क्लिक करा.

#3 तुम्हाला दिलेल्या ईमेल आयडीमध्ये एक OTP आला असेल तो बरोबर टाका आणि Create your Amazon account वर क्लिक करा.

आणि जर OTP आला नसेल तर resend otp वर क्लिक करा म्हणजे परत ओटीपी येईल.

#4 येथे प्राप्तकर्त्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल. प्राप्तकर्त्याच्या नावाच्या जागी ज्याच्या बँक खात्यात तुम्हाला पेमेंट करायचे आहे त्याचे नाव प्रविष्ट करा.

पत्त्याच्या जागी तुमचा पूर्ण पत्ता प्रविष्ट करा. आणि तुमचा पिन नंबर, राज्य, मोबाईल नंबर इत्यादी अचूक भरा.

#5 येथे तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मद्वारे प्रोडक्टची जाहिरात करायची आहे त्याची लिंक द्या.

म्हणजेच तुमची वेबसाइट, अॅप्लिकेशन, यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज असल्यास त्या प्रोडक्टची लिंक घ्या.

त्यानंतर पुढील पेज उघडण्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करा.

#6 आता तुमचे प्रोफाइल तयार करण्यासाठी काही प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ, तुमची वेबसाइट/यूट्यूब चॅनल आहे का त्याचे नाव, तुम्ही काय विकणार आहात, तुम्ही ट्रॅफिक कुठून आणणार आहात व् किती ट्रॅफिक आणणार इत्यादी।

शेवटी कॅप्चा भरा आणि contract terms च्या बॉक्सवर टिक करा आणि प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी Finish वर क्लिक करा.

नंतर तुमच्या समोर मेसेज दिसेल अभिनंदन तुमचे Amazon एफिलिएट खाते तयार केले गेले आहे. आता तुमच्या समोर काही नोटीस येईल जिथे असे लिहिले जाईल की 24 तासांच्या आत तुम्हाला एफिलिएट खात्यात पूर्ण प्रवेश मिळेल.

आता तुम्हाला पेमेंट मेथड जोडण्यास सांगितले जाईल. पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला बँक तपशील जोडावे लागतील. खातेदाराचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड इत्यादी सबमिट करावे लागेल. खाते तयार केल्यापासून 180 दिवसांच्या आत तुम्हाला किमान एक तरी प्रोडक्टची विक्री पूर्ण करावी लागेल अन्यथा तुमचे एफिलिएट खाते बंद केले जाईल.

अश्याच प्रकारच्या माहितीसाठी wiki123.in या वेबसाइटला भेट द्या धन्यवाद.!

Leave a Comment

Your email address will not be published.