क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Meaning In Marathi | Cryptocurrency Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला Cryptocurrency Meaning In Marathi | Cryptocurrency Information In Marathi बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Cryptocurrency Meaning In Marathi
Cryptocurrency Meaning In Marathi

Cryptocurrency Meaning In Marathi | Cryptocurrency Information In Marathi | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक डिजिटल चलन आहे. त्याला वर्चुअल करेंसी सुद्धा म्हटले जाते. या क्रिप्टोकरन्सी ला तुम्ही रूपये, डॉलर व इतर कोणत्याही चलनाप्रमाणे हाथ लावू शकत नाही. आपन त्याला फक्त ऑनलाइन वॉलेट मध्ये स्टोर करू शकतो. आणि त्याला कम्प्यूटर लॅपटॉप किंवा मोबाइल द्वारे बघू शकतो.

क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी चा वापर करतात त्याचे काम ट्रांसेक्शन्सला मॅनेज करणे आणि रेकॉर्ड ठेवणे हे आहे. हे एक विकेंद्रित चलन आहे ज्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीची सुरक्षा क्रिप्टोग्राफीद्वारे केली जाते.

क्रिप्टोग्राफी ही एक अशी सुरक्षा यंत्रणा आहे जिच्याद्वारे क्रिप्टो व्यवहारांची पडताळणी केली जाते. क्रिप्टोग्राफी द्वारे न समजल्या जाणाऱ्या डिजिटल डेटाला टेक्स्ट मध्ये बदलले जाते. आणि केवळ तीच व्यक्ती ते वाचू शकते. त्यासाठी ती माहिती सुरक्षित ठेवली जाते. म्हणजेच क्रिप्टोग्राफी सुरक्षा प्रणाली असल्याने क्रिप्टोकरन्सीशी छेडछाड करणे सोपे नाही.

जर आपण बोललो क्रिप्टोकरन्सी खर्च करण्याबद्दल तर तुम्ही हे चलन ऑनलाइन प्रोडक्ट किंवा सर्विसेस खरेदी करण्यासाठी वापरू शकता.

आता तुम्हाला क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आहे हे समजले असेलच.

Types of Cryptocurrency In Marathi क्रिप्टोकरन्सीचे प्रकार?

also read: Bitcoin Meaning In Marathi

1.Bitcoin (BTC)

बिटकॉइन ही जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. जिचा शोध सातोशी नाकामोटो यांनी 2009 मध्ये लावला होता. तेव्हा पासून त्याची लोकप्रियता वाढतच चालली आहे. बिटकॉइन हे एक विकेंद्रित चलन आहे. म्हणजे यावर कोणत्याही सरकार किंवा संस्थेचे नियंत्रण नाही. बिटकॉइनची किंमत ही आजच्या काळात खूप जास्त आहे.

2.LiteCoin (LTC)

लाइटकॉइन ही बिटकॉइन सारखीच क्रिप्टोकरन्सी आहे. आणि ती विकेंद्रित तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्य करते. लाइटकॉइन क्रिप्टोकरन्सी चार्ल्स ली यांनी सुरू केली होती. हे बिटकॉइनपेक्षा जलद काम करते कारण लाइटकॉइनची ब्लॉक जनरेशन वेळ बिटकॉइनच्या तुलनेत 4 पट कमी आहे.

3.Ethereum (ETH)

इथेरेयम हे देखील क्रिप्टोकरन्सीचा एक प्रकार आहे. आणि तो ब्लॉकचेनवर आधारित एक ओपन सोर्स विकेंद्रित कंप्यूटिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर चलन अदलाबदल करण्यासाठी केला जातो. या क्रिप्टोकरन्सीच्या दोन Version आहेत. पहिले इथेरेयम आणि दुसरे म्हणजे इथेरेयम क्लासिक हे दोन्ही खूप प्रसिद्ध आहेत.

4.Monero

मोनेरो क्रिप्टोकरन्सी 2014 मध्ये सुरु केली गेली होती. ही एक अशी क्रिप्टोकरन्सी आहे ज्यामध्ये एक विशेष प्रकारची सुरक्षा वापरली जाते आणि त्या सिक्युरिटीचे नाव आहे रिंग सिग्नेचर मोनेरो क्रिप्टोकरन्सी ‘डार्क वेब ब्लॅक मार्केट’ मध्ये वापरली जाते. ब्लॅक मार्केटिंग मध्ये खूप वापरले जाते.

Cryptocurrency Benefits In Marathi क्रिप्टोकरन्सीचे फायदे?

  • क्रिप्टोकरन्सी एक डिजिटल चलन आहे ज्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
  • क्रिप्टोकरन्सी सामान्य डिजिटल पेमेंटपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.
  • क्रिप्टोकरन्सीमधील खाते अतिशय सुरक्षित आहेत कारण त्यात विविध प्रकारचे क्रिप्टोग्राफी अल्गोरिदम वापरले जातात.
  • क्रिप्टोकरन्सी सहज विकत घेता येते आणि देशाबाहेर पाठवता येते आणि नंतर त्याचे पैशात रूपांतर करता येते.
  • क्रिप्टोकरन्सी चलनाचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांसाठी आहे ज्यांना त्यांचे पैसे लपवायचे आहेत.
  • क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित चलन आहे.

How to Buy Cryptocurrency In Marathi क्रिप्टोकरन्सी कशी खरेदी करावी?

तुम्हाला जर भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदी करायची असेल तर वझीरएक्स (WazirX) हे भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ऍप्प आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही या सर्व प्रकारची क्रिप्टोकरन्सी खरेदी करू शकता.

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

FAQ

Cryptocurrency Meaning In Marathi?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक डिजिटल चलन.

बिटकॉइन हे कोणते चलन आहे?

बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे.

बिटकॉइन चा शोध कोणी लावला?

बिटकॉइन चा शोध 2009 मध्ये सतोषी नाकामोटो नावाच्या व्यक्ति ने लावला.

Bitcoin Meaning In Marathi?

बिटकॉइन एक Digital Currency आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.