गुगल अॅडसेन्स म्हणजे काय? | Google AdSense Meaning in Marathi नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला गूगल एडसेंस बद्दल संपूर्ण माहीती सांगणार आहे. गूगल एडसेंस म्हणजे काय व ते कसे काम करते आणि एडसेंस ने पैसे कसे कमवायचे.

अनुक्रमणिका
गुगल अॅडसेन्स म्हणजे काय? | Google AdSense Meaning in Marathi
ऐडसेंस हे गूगल कंपनीचे एक Advertising प्लेटफॉर्म आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वेबसाइट (ब्लॉग) किंवा यूट्यूब व्हिडिओ वर Ad लावून पैसे कमवू शकता.
गूगल तुमच्या वेबसाइट वरील कॉन्टेंट नुसार प्रेक्षकांना जाहिराती दाखवतो. जेव्हा ह्या जाहिराती वर कोणत्याही व्यक्तिने क्लीक केल्यावर तुम्हाला त्याचे पैसे दिले जाते.
Google Adsense चे फायदे?
- एका एडसेंस एकाउंट मध्ये अनलिमिटेड वेबसाइट्स अॅड करू शकतो.
- गूगल एडसेंस चा उपयोग करने अगदी सोपे आहे.
- गूगल एडसेंसच्या प्रत्येक समस्याचे उपाय इंटरनेटवर उपलब्ध आहे.
- गूगल एडसेंस ने इतर अॅड नेटवर्क पेक्षा सर्वात जास्त इनकम होते.
- गूगल एडसेंस ची इनकम 23 तारखेला डायरेक्ट आपल्या बँक अकाउंट मध्ये येते.
गूगल एडसेंस एकाउंट बनवण्यासाठी काय पाहिजे?
एडसेंस मध्ये एकाउंट बनवण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी असल्या पाहिजे जसे.
गूगल चे Gmail एकाउंट असणे आवश्यक आहे.
एक वेबसाइट असली पाहिजे.
तुमच्या वेबसाइटवर कमीत कमी 15 पोस्ट असल्या पाहिजे.
तुमचे वेबसाइट वरील पोस्ट तुम्ही स्वता लिहिलेल्या असल्या पाहिजे कॉपी केकेल्या पोस्ट नसल्या पाहिजे.
वेबसाइटसाठी एडसेंसचे एकाउंट बनवत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
Google Adsense मध्ये एकाउंट कसे बनवावे? | Google Adsense Information in Marathi
Step 1: सगळ्यात अगोदर गूगल एडसेंस च्या वेबसाइट वर जा.
Step 2: जर तुमच्याकडे गूगल चे Gmail एकाउंट असेल तर तुम्ही Sign in वर क्लीक करून लॉग इन वर क्लीक करा.
Step 3: तुमच्या वेबसाइट चा URL एंटर करा. नंतर Get more out of Adsense च्या Yes किंवा No एक ऑप्शन निवडा. त्यानंतर Your payment country/territory मध्ये India सेलेक्ट करा.
Step 4: Terms & Condition ला पुर्णपने वाचून Accept करा.
Step 5: Start using Adsense वर क्लीक करा, आता तुमचे एडसेंस एकाउंट बनले आहे, या नंतर तुम्ही तुमच्या payment address ची माहीती टाकून Submit करा.
एकाउंट बनवल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला गूगल कडून एक ईमेल येईल ज्यात तुमच्या वेबसाइटला Approve किंवा Reject झाल्याची माहिती दिलेली असेल.
Approval मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या वेबसाइटवर कुठेही अॅड लावू शकता.
गूगल एडसेंस कसे काम करतो?
हे डिजिटल मार्केटिंगचे युग आहे आणि आता सर्व प्रकारच्या लहान मोठ्या कंपण्या ऑनलाइन जाहिरातींवर जास्त पैसे खर्च करत आहे. गूगल एडसेंस ह्या कंपन्यांकडून जाहिराती घेतो आणि त्या जाहिरातींना ऐडसेंस सम्बंधित वेबसाइट्स वर दाखवतो.
पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..
हे देखील वाचा :